दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
वारणानगर– महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणांऱ्या श्री वारणा भगिनी मंडळ संस्थेने दोन कोटींची वार्षिक उलाढाल केल्याची माहीती उपाध्यक्षा स्नेहाताई निपुणराव कोरे यांनी सभेत दिली.
येथील श्री वारणा भगिनी मंडळाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.
यावेळी स्नेहाताई कोरे म्हणाल्या, संस्थेचे सर्व अधिकारी व महिलांनी परिश्रम घेतल्याबददल दोन कोटींची विक्री झाली.
सभेस सावित्री औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, भगिनी मंडळाच्या संचालिका श्रुती विश्वेश कोरे, मॅनेजर जालंदर पवार,सचिव सौ कल्पना पडवळ सर्व महिला संचालक, सभासद, मोठया संख्येने उपस्थित होते.
अकौटंट हेमनंदा पाटील यांनी यांनी नोटीस वाचन केले तर जयश्री कुलकर्णी यांनी प्रोसेंडींग वाचन केले. यावर्षीच्या आदर्श कामगार म्हणून श्रीमती वनिता बडवे, श्रीमती पंकुताई शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे गणेश लोळगे (पारगाव ) यांनी मार्गदर्शन केले.
संचालिका शारदा महाजन यांनी ओळख करून दिली. वर्षा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
…………………
फोटो ओळी- श्री वारणा भगिनी मंडळाच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षा स्नेहाताई कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सावित्री संस्था अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, संचालिका श्रुती कोरे व संचालक मंडळ,