दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नागपूर दि. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणारे वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांचे वंशज असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक दिवंगत राजेंद्र शंकर गायकवाड यांचा ६० व्या स्मृतीदिन आणि ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्रा सह देशातील अनेक राज्यातील आंबेडकरवादी अनुसाई भीमसैनिक नागपूर येथील दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक व अभिवादन करण्यासाठी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अनेक भीमसैनिक येत असतात या येणाऱ्या भीमसैनिकांना बहुजन जनता दलाच्या वतीने बुधवार दि ५ आॕक्टोबर २०२२ रोजी दिवंगत दादासाहेब गायकवाड पुतळा जवळ दिक्षाभुमि नागपूर येथे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोफत भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख यांनी केले असून या कार्यक्रमाला वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांचे १४ वे वंशज असलेले उद्योजक आणि युवराज जयेश राजेंद्र गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार असून तर सौ अलकाताई अरुण रणधिर (अध्यक्षा रयत कष्टकरी मजूर राहणार आहेत दीक्षाभूमीवर येणाऱ्या भीमसैनिकांनी बहुजन जनता दलाच्या भव्य मोफत भोजनदानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे बहुजन जनता दल नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी थोरात अक्षय तागडे सतीश काळे प्रेम बागडे रवी ढोणे देवराज धराजे किशोर राऊत सुनील पाटील सुधीर धकाते सुनील वासाडे सुरेश शिंदे महाजन तिवारी जी सुनील पाटील आनंद गजभिये धनराज राऊत मिलिंद भगत नरेंद्र मोदघर राहुल पाटील अमर प्रधान अथर्व खंडाईत परविन तिरपुटे सुरेंद्र वानखडे गौरव देशभ्रतार सुरेंद्र देठे यांच्यासह बहुजन जनता दल महिला आघाडी युवा आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे .असे कार्यक्रमाचे आयोजक आणि बहुजन जनता दलाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख यांनी कळविले आहे