दै,चालु वार्ता /
मोलगी प्रतिनिधी /
रविंद्र पाडवी /
मोलगी : मोलगी परिसर हा गौरवशाली परंपरा वैशिष्ट्यपूर्ण जीवन व मानवी मूल्य जपणारा तालुका आहे. परंतु अलीकडे तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू असल्यामुळे वरील बाबींना धोका निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर असंख्य बांधवाचा संसार उघड्यावर आला असून देशाचे भावी जबाबदार नागरिक ठरणाऱ्या शेकडो मुला-मुलींचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्याला सर्वस्वी दारू सट्टा जुगार व अन्य अवैध धंदे कारणीभूत आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील सट्टा जुगार व अन्य सर्व अड्डे बंद करावे. सातपुडा म्हटल्यानंतर अवैध धंद्यांना अनुकूल ठिकाण अशी ओळख निर्माण झाली .असून बनावट दारूचे कारखाने विनापरवाना चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक या बाबी राजरोसपणे पणे सुरु आहे. मोलगी परिसरात तून लाकूड व अन्य वनसंपदेचे तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वैभवशाली सातपुडा बोडका झाला. असून परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर वर बंदी असली तरी गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मोलगी परिसरात मात्र गुटखा विक्री मोकळे रान आहे. परिणामी युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यासाठी गुजरात व मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या गुटख्यावर बंदी आणावी. या परिसरात चो-याचे प्रमाण वाढले असून नेहमी होणाऱ्या चो-यामुळे तालुक्यातील जन जीवन अडचणीत सापडले आहे. सर्वसामान्य मध्ये भीती निर्माण झाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त साठी ठोस पावले उचलावीत शिवाय तालुक्यात काही वाहनांमधून प्रवेशाची जीवघेणी वाहतूक सुरू असून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अशा वाहतुकीवर नियंत्रण आणावे. अशा या प्रकारामुळे मोलगी परिसरातील सुरक्षा ऐरणीवर आली असून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परिसरात शांतता सलोख्यासाठी सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे. या धंद्याच्या नियंत्रणासाठी योग्य कारवाई न झाल्यास साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येईल दरम्यान उद्भवणार्या समस्या तालुका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन सह पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मोलगी, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभागीय पोलीस कार्यालय अक्कलकुवा, जिल्हाधिकारी सो, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सही अन्ड सरदारसिंग रुपसिंग वसावे, संदीप राजीव वळवी, मगलसिंग बिज्या वसावे, इत्यादींचे सह्या आहे.