दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : कंगना गेल्या काही दिवसांपासून ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना ही निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या कंगना अनेक चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘थलायवी’ या चित्रपटाच्या यशानंतर आता कंगना निर्मिती क्षेत्रात तिचे नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहे.
कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. नुकतंच कंगनाने या चित्रपटाचे तीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील पहिल्या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा दिसत आहे. त्याच्या पोस्टरवर ‘मिट शेरु’ असे लिहिण्यात आले आहे. ‘हम जब मिलते हैं, तो दिल से मिलते हैं, वरना ख़्वाबों में भी मुश्किल से मिलते हैं,’ असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे.
तर दुसऱ्या पोस्टरवर ‘इंट्रोड्युसिंग टिकू’ असे लिहिण्यात आले आहे. ‘चलो तो चाँद तक , नहीं तो शाम तक,’ असे कॅप्शन हे पोस्टर शेअर करतेवेळी कंगनाने दिले आहे. त्यानंतर अवघ्या दोन तासांपूर्वी कंगनाने या चित्रपटासंदर्भातील आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. त्यावर ‘टिकू वेड्स शेरु’ असे चित्रपटाचे नाव लिहिले आहे. यावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असेही लिहिण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मणिकर्णिका फिल्म्स’द्वारे केली जात आहे.
Related Stories
1 year ago