दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार येथे आज दि.25/10/22 रोजी दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी.एस.लोखंडे पाटील यांनी श्री सद्गुरु हॉस्पिटल कंधार व श्री सद्गुरू मेडिकल स्टोअर्स कंधार येथे भेट दिली, या प्रसंगी संपादक डी.एस.लोखंडे पाटील यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व दैनिक चालु वार्ता अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संपादक डी.एस.लोखंडे पाटील यांनी आपल्या बालपणीच्या गमती जमती आणि एकूनच जीवनावर उजाळा टाकत म्हणाले जि.प.प्रा. शाळा मजरे धर्मापूरी येथील शिक्षक बोडेवाड सर व केंद्रे यु.बी व उप्परवाड जी.एस सरांमुळे मी घडलो पण माझ्या बरोबर अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर पोहचलो पहिली ते पाचवी चे प्राथमिक शिक्षण हे आपल्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असते. यांत चांगले मार्गदर्शन करणारे गुरू लाभणे हे पण तितकच महत्त्वाचे असते. शिक्षक चांगले मिळाले म्हणून आम्ही घडलो हे मी माझे भाग्य समजतो असे दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी.एस लोखंडे पाटील यांनी मार्मिक उदाहरण देत म्हणाले तुम्ही जे पेरले ते उगवत असते असा सुसंदेश देत आज आपला दैनिक चालू वार्ता न्यूज पेपर हा समाजात रुजत आहे. दैनिक चालू वार्ताचे एक जाळे पसरले आहे. अल्पावधीतच दैनिक चालू वार्ता एका फार मोठ्या प्रगतीपथावर जाणार आहे . येणाऱ्या नजीकच्या काळात दैनिक चालू वार्ता महाराष्ट्रातील अन्यायाविरुद्ध जोरदार प्रतिकार करून आवाज उठवेल व गोरगरिबांची कामे पण तात्काळ करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडेल असे बोलताना म्हणाले.
यावेळी बोडेवाड जी.पी सर , सदाशिव गायकवाड , जेलेवाड पी.एम.कार्यकारी संपादक राम लोखंडे,शिवाजी नगर प्रतिनिधी दत्ता पवार , सद्गुरू मेडिकलचे प्रो.प्रा दै.बालाघाट आवाजचे तालुका प्रतिनीधी मुंडे धोंडीबा ,प्रा डॉ नामदेव राठोड , डॉ प्रदिप राजपूत , दैनिक चालू वार्ता चे कंधार तालुका प्रतिनीधी माधव गोटमवाड, दै.चालू वार्ता बहादरपूरा सर्कल प्रतिनिधी नरसिंग पेठकर आदी उपस्थित होते.