दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज:- कंधार तालुक्यातील व मतदानाला मुखेड विधानसभेत सामाविष्ट पेठवडज सर्कल म्हणजे माय घरला येऊ देईना आण बाप भीक मागू देईना.सोनासारखा सणाचा राजा दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप केला आहे.त्यामध्ये रवा,साखर,गोडतेल,चनादाळ प्रत्येकी एक किलो प्रमाणे शासनाने दिले आहे.परंतु ज्या कंपनीला पुरवठा करण्याचे गुत्ते दिले आहे त्यांनी पेठवडज सर्कल मधील एकाही गावामध्ये आनंदाची शिधा वाटप झाली नसून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आनंदाचा शिधा आला काय म्हणून लोक स्वस्त धान्य दुकानदाराकडे व रस्त्याकडे टक लावून बसले आहेत.प्रशासनाने लवकर शिधा वाटप करुन गरीबांची उरली सुरली दिवाळी गोड करावी अशी मागणी पेठवडज सर्कल मधील गरीब जनतेने केली आहे.