दैनिक चालू वार्ता सावरगाव प्रतिनिधी-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये प्रा.डाॅ. नारायण बालपांडे सहाय्यक प्राध्यापक नगरपरिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड येथे कार्यरत आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर राज्यशास्त्र अभ्यास मंडळात विजयी झाले. आपणा सर्वांच्या विश्वासाने हे शक्य झाले आहे. आपण दाखवलेल्या या विश्वासासाठी मी आपला सदैव ऋणी राहील. अभ्यास मंडळात कार्य करतानां आपण दाखवलेल्या विश्वासास मी कधीही तडा जावु देणार नाही. निश्चितच यासाठी आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची मला गरज भासणार आहे. मी सदैव आपल्या सूचना व मार्गदर्शनाचा सन्मानच करीन. माझ्या या प्रयत्नात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सहकार्य करणा-या सर्वांच्याच समस्यांचे निराकरण करण्याचा मी पुर्ण प्रयत्न करेन. पुन्हा एकदा सर्व गुरुजनांचा, मित्रमंडळींचा, बंधु-भगिनींचा आपण केलेल्या सहकार्यासाठी आपला आजन्म ऋणी आहे. सर्वांचे हे प्रेम असेच कायम असू द्यावे.असे अभिनंदन कार्यक्रमात प्रतिपादन केले , व सर्वत्र त्यांचे स्वागत करण्यात आले ,