दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड दि २० ( प्रतिनिधी ) मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूल मध्ये रविवार दि २२ रोजी दुपारी २.०० ते ६.०० दरम्यान हळदीकुंकू व आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
मकरसंक्रातीचे औचित्य साधून जिजाऊ ज्ञानमंदिरात जिजाऊ ज्ञानमंदिर महिला परिवाराच्या वतीने ‘ हळदी कुंकू ‘ व ‘ खास शालेय विद्यार्थ्यांसाठी खरी कमाई अर्थात ‘ आनंद बाजार ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ . शारदाताई विरभद्र हिमगीरे या तर आनंद बाजार च्या उद्घाटनासाठी मुखेडचे पोलीस उपनिरीक्षक श्री. नरहरी त्र्यंबक फड तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. गजानन काळे , मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. शेखर पाटील , केद्रप्रमुख श्री डॉ. शिवाजी कराळे , अस्थिरोग तज्ञ डॉ. सतिश धमणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. एक निमित्य म्हणून मकर संक्रातीचे औचित्य साधून ‘ तीळगुळ घ्या गोड गोड बोला ‘ हा योग जुळून आला आहे. विधार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाचा कस पाहण्यासाठी ‘ आनंद बाजार ‘ अर्थात खरी कमाई या उपक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमास विद्यार्थी पालक व इष्ट मित्रांनी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन जिजाऊ ज्ञानमंदिर परिवार मुखेड च्यावतीने संचालिका सौ . शकुंतला ज्ञानोबा जोगदंड व मुख्याध्यापक जगदीप जोगदंड तसेच समस्त शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.