दैनिक चालू वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/ अंबाजोगाई— दिनांक 21/ 2/ 2023 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यात पावसामुळे संपूर्ण शेतकरी चे कधीही न भरून निघणारे आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचे अनुदान तात्काळ वाटप करणे श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे. सरकारने अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. सद्यस्थितीत शेतकरी हा आर्थिक संकटाचा सामना करत असून अद्याप पर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. तसेच एपीएल व इतर राशन कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेले धान्य पूर्वत सुरू करणे बाबत शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रुपये 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये .एक शेतकरी एक डीपी योजनेचे अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच या मोर्चामध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब तसेच माजी आमदार संजय भाऊ दौंड माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे तसेच भीमसेन आप्पा लोमटे व अनेक कार्यकर्ते सहभागी होते