दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्टेट पाॅवर जनरेशन कंपनी लिमि. च्या माध्यमातून २६/११/२०२० ला महाजनको करार CSTPS मॉडेल PPP बॅरेज झरपट नदीच्या पात्रात बांधण्यात आला. ज्या परिसरात हा बॅरेज बांधल्या गेला ते पुरग्रस्त क्षेत्र असून त्या बाबत मागील कित्येक दिवसापासून चंद्रपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्टेट पाॅवर जनरेशन कंपनी लिमि.च्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला संबंधित विषयाबाबत श्री. सोलंकी चीफ इंजिनिअर (सिविल) जेन- १, महाराष्ट्र स्टेट पॉवर जेन. को. लिमि मुंबई. सोबत दिनांक २२/२/२०२३ ला माटुंगा मुंबई स्थित त्यांच्या कार्यालयात सकाळी ११:३० वाजता चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा महाकाली प्रभाग १२चे माजी नगरसेवक नंदू नागरकर , भिवापूर प्रभाग १४ चे माजी नगरसेवकद्वय वसंत देशमुख व सतीश घोनमोडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या प्रभागात उध्दभवणाऱ्या परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देवुन त्यावर काही उपाय, योजनाही सुचविल्या त्यात प्रामुख्याने नदीच्या पात्राचे खोलीकरण करणे, बॅरेज ला चालू करण्यापूर्वी नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधावी, अतिवृष्टीचा विचार करता बॅरेज ला ऑटोमॅटिक ओपनींग दरवाजे लावावेत, एकोर्निया वनस्पती चा विचार संघ्यान मध्ये घेत बॅरेजला सायरन/अलार्म अलर्ट टेकनॉलॉजि चा वापर करावा, बॅरेजवर २४ तास सेक्यूरीटी ठेवण्यात यावी जेणे करून अचानक समोर येणा-या परिस्थिति ची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळत राहील. झरपट नदीच्या पात्रात बांधण्यात आलेल्या बॅरेजबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी २७/२/२०२३ पासून सुरु होणाऱ्या विधानसभा सत्रात LAQ लावला आहे त्याच्या प्रश्न-उत्तरा दरम्यान सत्य पुढे येईलच. संबंधित विषयला घेऊन निवेदन मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे झुंझार आमदार किशोरभाऊ जोरगेवार मुंग गिळून गप्प का बसले आहे हे समजायला काही कारण नाही. श्री. सोलंकी साहेब, चीफ इंजिनिअर (सिविल) जेन- १, महाराष्ट्र स्टेट पॉवर जेन. को. लिमिटेड, मुंबई. यांनी आश्वासन दिले कि विश्वराज इन्व्होर्मेन्ट प्राव्हेट लिमिटेड (VEPL) कंपनी सोबत बोलून सुचविण्यात आलेल्या सर्व गोष्टीं वर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करता येईल. जर येत्या १५ दिवसात या प्रश्नाला मार्गी लावले नाही तर महानगरपालिका चंद्रपूर समोर १ दिवसीय लक्षणीय उपोषण आणि झरपट नदीच्या पात्रात जल समाधी आंदोलन असे अनेक उपक्रम चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर, महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड आणि विश्वराज इन्व्होर्मेन्ट प्राव्हेट लिमिटेड (VEPL) कंपनी विरोधात प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी उपरोक्त कंपन्यांची राहील असेही श्री. नागरकर यांनी पाठविलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.