दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा यंदाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब शेटे यांना प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.शेटे यांनी शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक कार्यात केलेल्या भरीव कामगिरीची दाखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांच्यावर चहूबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना जव्हार शाखेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन संघटने मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.भाऊसाहेब शेटे यांच्या या सत्कार प्रसंगी आदिवासी शिक्षक संघटनेचे जव्हार तालुकाध्यक्ष साईनाथ डोके,उपाध्यक्ष मनोज भोये,रामू दिवा,कार्याध्यक्ष विनायक दळवी,सरचिटणीस प्रकाश लहारे,पालघर जिल्हा संघटक उमेश जाबर व जिल्हा प्रसिद्ध प्रमुख प्रदीप चौधरी उपस्थित होते.