दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
ता.मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालयात अगदी कडक बंदोबस्तात, नियोजनबद्ध, पध्दतीने दहावीच्या परिक्षा पारपडत आहेत. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना तेथील मुख्याधापक कोयले पी.एम . यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने ज्यादा क्लासद्वारे गुणवत्तापूर्ण , शिक्षण दिल्या जाते. या विद्यालयात , दि .02/03/23 पासून दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत, दरम्यान परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शासनाचे बैठे पथक परीक्षा केंद्रात होते या परीक्षा केंद्रावर 266 विद्यार्थ्यांपैकी 261 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले तर सहा विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉक्टर मनोहर तोटरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.तसेच केंद्रप्रमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक कोयले पी.एम, उपमुख्याध्यापक मोहम्मद सर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर, हेमंत घाटे सर, परीक्षा प्रमुख पवळे सर, सूर्यसर सर, सचिन मेनकुदळे सर, विजय पाटील सर, महेश शेवाळे सर सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. तसेच बैठे पथक तसेच भरारी पथक यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली..