दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- शितल रमेश पंडोरे
————————————————–
संभाजीनगर:- समृद्धी महामार्गावरील रात्री चा प्रवास आता धोकादायक ठरतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर दगडफेकीच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा अशीच काही घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर वैजापूरच्या सुराळा शिवारात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळील समृद्धी महामार्गावरील धावत्या प्रवासी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी तुफान दगडफेक करण्यात आली होती.
मोठा गाजावाजा करत सरकराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. मात्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून हा हायवे सतत कोणत्याना-कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. आधीच अपघातांच्या मालिकामुळे चर्चेत असलेला हा महामार्ग आता रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाहनांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोमवारी पुन्हा अशीच काही घटना समोर आली आहे. राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जीपने छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वैजापूरच्या सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असून, यात दोन जण जखमी झाले आहे. ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.