दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
तालुका नाभिक समाजाची सभा तालुक्याचे मावळते अध्यक्ष प्रदिप कदम यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. सभेत नवीन कार्यकारणी निवडीत पुढील तीन वर्षासाठी अध्यक्ष पदावर हिंदू ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान सचिव तथा पत्रकार सुशील यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.समाजसेवक सुशील यादव हे अभ्यासू असून त्यांनी तालुक्यात विविध समित्यावर यशस्वी पणे काम केले आहे.सामाजिक,सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या कार्य अनुभवाचा फायदा नाभिक समाज विकासासाठी आणि समाज प्रगतीकडे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात होईल.स्माजाचे नवनिर्वाचित कार्यकारिणीत उपाध्यक्ष रुपेश पवार,सचिव दीपल शिर्के,सहसचिव विजय बडे,खजिनदार अमोल कदम,कार्याध्यक्ष सुनिल भोसले यांची निवड करण्यात आली.या वेळी जेष्ठनेते महादेव कदम,दिलीप शिर्के, महेश खराडे,बुरुणकर,सदाशिव साळुंखे,घनश्याम कदम,अनंत शिंदे,अनंत पवार,निलेश भोसले,साहिल कदम,मंगेश कदम,वैभव जाधव,संदिप जाधव,प्रथमेश कदम, प्रशांत चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष सुशील यादव यांना सहकार्य करण्याचे आश्वासन मावळते अध्यक्ष प्रदिप कदम यांनी दिले.