दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर : -जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज स्वामी विवेकानंद रुग्णालय आणि संवेदना प्रकल्प हरंगूळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थलांतरित इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात दिव्यांगांना साधन साहित्याचे वाटपही करण्यात आले. सकाळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियानाच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ माझ्या व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत करण्यात आला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमास माझ्यासह पदमश्री डॉ. अशोक काका कुकडे, माजी मंत्री आणि आमदार श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीवराज बी. पी., अधिष्ठाता डॉ. श्री. समीर जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल, संवेदना प्रकल्पाचे श्री. सुरेश दादा पाटील, उपअधिष्ठाता डॉ. श्री. अजित नागावकर, डॉ. श्री. उमेश लाड, डॉ. श्री. गंगाधर अनमोड, डॉ. श्री. अजय ओव्हाळ, डॉ. श्री. उदय मोहिते, डॉ. श्री. शैलेंद्र चव्हाण, डॉ. श्री. महादेव बनसोडे, डॉ. नीलिमा देशपांडे, श्री. बसवराज पैके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.