दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
=====================
निलंगा : 07/04/2023 रोजी निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (अबू) यथे सोसायटीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी गावातील सर्व गावकरी यांनी मिळून हा सर्वानुमते अभिनंदनास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयात श्री धैर्यशील मनोहर कोरे यांना चेअरमन तर श्री निवृत्ती गुरूंनाथ हाराडे यांना व्हाईस चेअरमन पद देऊन गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच संचालक म्हणून श्री मेनोद्दीन उस्मान हलगरे, श्री फत्रोद्दीन गफूर शेख , श्री पांडुरंग नामदेव कोरे, श्री शरद यादव सूर्यवंशी, श्री गोरख विठोबा काचे, श्री मनमथअप्पा नागनाथअप्पा रंडाळे, श्रीमती अलका गोरोबा वाडीकर, श्रीमती सुशेलाबाई सुभान मंठाळे, आणि श्रीमती लैलाबी रशीद बिरादार यांची निवड करण्यात आली. ही निवड महसूल विभागाचे निवडणूक अधिकारी श्री आर. एल गडेकर आणि सोसायटी सेक्रेटरी तानाजी सूर्यवंशी आणि पाटील साहेब यांच्या अध्येक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.