दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनिधी -जगन्नाथ साठे
सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन मा.श्री राधाकृष्ण विखे-पाटील साहेब महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते व माढा लोकसभा खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपनन झाले.उद्घाटन झाल्यानंतर भाजपा सांगोला तालुका श्री चेतनसिंह (बाळासाहेब) केदार – सावंत यांच्या घरी नाम राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत निमित जेवणाचे असले तरी सांगोला तालुक्यात आणि जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा आहे, तर काही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील पक्ष वाढविण्यासाठी चेतन सिंह केदार यांना पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याची कुजबुज या दौऱ्यात ऐकावयास मिळाली.
चेतनसिंह केदार हे भाजपाचे तालुकाध्यक्ष असून त्यांनी तालुक्यात पक्ष वाढविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत.पक्षाच्या विविध शिबिरास ते हजर राहून बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.त्यांच्या कार्याची दखल, वरिष्ठ पातळीवर घेतली गेली होती. युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी असल्याने भाजपाला युवा आणि दमदार नेता तालुक्यात मिळाली असल्याची चर्चा नागरिकांतून चर्चिली जात आहे. आणि त्यांच्याच कार्याची दखल वरिष्ठ नेतेमंडळी मोठी जबाबदारी देवून करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यावेळी सांगोला विधानसभा सदस्य शहाजीबापू पाटील ,मंगळवेढा पंढरपूर विधानसभा सदस्य समाधान आवताडे ,माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपा सोलापूर माजी जिल्हाध्यक्ष श्री शहाजीभाऊ पवार,प्रणव परिचारक उपस्थित होते.