दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: शनिवारी (ता.१५ एप्रिल ) रोजी इंदापूर बार असोसिएशन कार्यकारणी निवडणूक बिनविरोध पार पडली . इंदापूर बार असोसिएशनचे परंपरानुसार सन्माननीय कार्यरत असलेल्या सध्याचे कार्यकारणीचे अध्यक्ष व त्यांच्या सहकारी पदाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या सीनियर वकिलांचे कमिटीने सन २०२३- २४ करिता नवीन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड केली.
यामध्ये विधीज्ञ नरेंद्र शहा आणि विधीज्ञ माधव. टी .शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष विधीज्ञ धैर्यशील नलवडे व विधीज्ञ अनिल पारेकर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी विधीज्ञ असिफ बागवान यांची खाजदार पदी विधीज्ञ संकेत नगरे, ग्रंथपाल पदी विधीज्ञ वैजनाथ गायकवाड, सदस्य पदी विधीज्ञ विशाल राऊत, महिला प्रतिनिधी म्हणून विधीज्ञ जयश्री खबाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
इंदापूर बार असोसिएशन कार्यकारणी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व बार असोसिएशनच्या सदस्यांचे विशेष कौतुक होत असताना दिसत आहे.