दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा शहरात समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती व भव्य मिरवणूक दि. २२ एप्रिल रोजी निघणार असून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात दि. २०-४-२०२३रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे ठिकाण श्री शनी मंदिर ते धावरी फाटा असे राहिल. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक९११२१३३०१४,९५१८ ९५१०१५ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच दि. २०-४-२०२३ इंदिरा स्कूल लोहा येथे दुपारी ३ वाजता निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, रोजी दि. २२-४-२०२३ रोजी सकाळी १ वाजता शिभप ज्योतीताई दापशेडकर यांचे बसव किर्तनाचे आयोजन जुना लोहा येथील मारोती मंदिराच्या बाजुस आयोजित करण्यात आले आहे.तसेच दुपारी ३वाजता महादेव मंदिर जुना लोहा येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी महादेव मंदिर जुना लोहा ते ओमकारेश्वर मंदिर शिवकल्याण नगर अशी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दि.२२-४-२०२३ रोजी रात्री ९ वाजता महात्मा बसवेश्वर समता पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन व सर्व विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व योग्य तो पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे.
तेव्हा लोहा शहरात होणाऱ्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीत व सर्व कार्यक्रमात सर्व जनतेनी सामिल व्हावे असे आवाहन सार्वजनिक महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.