दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथील सचिन दता पवार या विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत ७२० पैकी ६४८ गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला आहे.
सचिन दता पवार लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथील सायाळ येथील शेतकरी दता पवार यांचे दितीय चिरंजीव आहेत तर छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांचे पुतणे आहेत.
सचिन दता पवार यांनी गेल्यावर्षी ही नीट ची परिक्षा दिली होती त्यावेळी व त्यावेळी त्यांना ५०२ गुण मिळाले होते व गेल्या वर्षी त्यांचा एमबीबीएस ला प्रवेश हुकला पण सचिन दता पवार यांनी जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर हार न मानता दुसऱ्या प्रयत्नात यंदा हे मध्ये नीट ची परीक्षा दिली व त्यांचा निकाल आता नुकताच जून मध्ये लागला असुन सचिनने यावेळेस ७२० पैकी ६४८ गुण घेऊन लोहा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे व तो एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला आहे.
या अगोदर दोन वर्षांपूर्वी त्यांचा मोठा भाऊ ओमकार दता पवार हा नीट परिक्षेत पास होऊन एमबीबीएस चे शिक्षण दितीय वर्षात घेत आहे.
बंधु ओमकार यांच्या पाठोपाठ सचिन ही नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरला असल्यामुळे त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.
तसेच सचिन पवार यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे वडील दत्ता पवार,आई सविता दता पवार , गुरुजनांना व त्यांचे काका छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी दिले आहे.