दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती शक्य नाही त्यासाठी शिक्षण घेऊन आपले आणि आपल्या गावचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील धावरी येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शिक्षक बांधवांचा सत्कार सन्मान सोहळा खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती दिलीप पाटील गाडेकर हे होते व तसेच आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना मिनी सोयाबीनच्या बॅगा नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर ,भाजपा जिल्हासरचिटणीस प्रवीण पा. चिखलीकर, पोलीस निरीक्षक संतोष तांबे , लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पा.शिंदे, कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार , शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, केंद्रप्रमुख बाबुराव फसमले,
परमेश्वर मिरकुटे,रामराव पा.पवार,रुक्माजी पाटील पवार,साहेबराव पा. काळे,सरपंच माणिकराव वाकडे,संग्राम पा.गाडेकर, गोविंदराव पा. वाकडे, दिलीपराव पा.गाडेकर,शंकर पा. काळे,अशोक गीते,पांडुरंग पा. कौशल्ये,शिवाजीराव वाकडे, राजू वाकडे,शंकर पा. पवार,मनोहर गाडेकर,कैलास वाकडे,गणेशराव गाडेकर,चांदू कुर्णापल्ले,बाळाजी पा. वाकडे,मोतीराम पा. वाकडे, पंडितराव पा.गाडेकर,देवराव पा. वाकडे,मुख्याध्यापक प्रभाकर कदम, कोंडीबा पा. मलकापूरकर, आनंदराव मलकापूर,विक्रम कदम , मुख्याध्यापक बि.वाय.चव्हाण ,भीमराव पा.वाकडे, शिवमुद्रा जनकल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नंदाजी इंगळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की गावाच्या विकासासाठी कुणाच्याही दाराला जाण्याची गरज पडू देणार नाही महादेव मंदिरासाठी दहा लाख रुपये पंचवीस पंधरा मध्ये दहा लक्ष आणि जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंड नंदकिशोर माध्यमिक विद्यालय धावरी च्या शाळेचे कंपाउंड च्या व स्वच्छता संकुल चे काम विविध योजना मधुन त्वरित सुरू केले जाईल असेही ते म्हणाले नंदिकेश्वर माध्यमिक विद्यालयाची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या शाळेला सर्व मूलभूत सुविधा पुरवले जातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य शिक्षण घेऊन आपले आणि आपल्या गावचे नाव उज्वल करावे असेही प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आयोजन धावरी करांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी तर आभार शंकर पवार यांनी मांडले यावेळी शाळेतील व गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.