दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकाभिमुख योजनेची अंमलबजावणी होत, असल्याने देश प्रगतीच्या राजमार्गावरून वाटचाल आहे. असे प्रतिपादन भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले.
नरेंद्र मोदी सरकारला नऊ 9 पूर्ण झाल्या निमित्त भाजपा तर्फे स्वतंत्र महाजन संपर्क अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती गावागावात तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्यात येत आहे, या अनुषंगाने शनिवारी भाजप आ. डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली.
राज्यातील सेना भाजपा युती सरकारने अनेक योजना जनकल्याणकारी सुरू ठेवले आहेत शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे वर्षाला 6000 रुपये देण्यात येणार आहे एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जोडला गेला आहे पिक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ 1₹रुपयात लागू झाली आहे. एसटी बस मधून जेष्ठांना मोफत प्रवास महिलांना अर्धे तिकीट लागू केले आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप होणार आहे शालेय शिष्यवृत्ती रकमेतही वाढ झाली आहे मुखेड कंधार मतदार संघातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून दोन महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे असे डॉ. राठोड म्हणाले
उदगीर- मुक्रमाबाद- देगलूर महामार्गासाठी 360 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नांदेड -कौठा -मुखेड बिदर -नांदेड- जांब -जळकोट उदगीर -बिदर मार्ग पूर्ण होत आहे. लेंडी आंतरराज्य प्रकल्पासाठी स्वेच्छा पुनर्वसनासाठी मुक्रामाबाद परिसरातील लाभार्थ्यांसाठी 93 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत, वाढीव कुटुंब शुभेच्छा पुनर्वसनासाठी निधी मंजूर झाला आहे, लेंडी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे, त्यासाठी मोठा निधी आणणार आहोत असे ते म्हणाले,सीआर एफ मधून बाराळी -हाळणी 63 कोटी खंडगाव ते राजुरा 52 कोटी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. 85 तांडे वाडी पक्क्या रस्त्याचे जोडले आहेत,मुखेड शहरा न. पा.पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत योजनेतून 2 कोटी 52 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत.श्री वीरभद्र मंदिर जीर्णोद्धासाठी 5 कोटी रुपये दिले, आगामी काळात मोठा निधी आणून असे त्यांनी सांगितले बोधन- मुखेड- लातूर रोड लोहमार्ग मंजूर करून आणू असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. वीरभद्र हिमगिरे डॉ. माधव पाटील उच्चेकर लक्ष्मण पाटील खैरकेकर, खुशाल पाटील उमदरीकर, डॉ. व्यंकट सुभेदार भोसले, किशोर चव्हाण व्यंकट लोहबंदे, किरण पाटील बोडके, हेमंत खंकरे
व्यंकटराव जाधव, राजू घोडके, उत्तम बनसोडे बबन ठाकूर, राजेश गज्जलवाड, शिवाजी राठोड, सर अनेक जण उपस्थित होते.