अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकावरील लाठीचार्ज प्रकरणाचा ठपका ठेवून गोंदीचे सपोनि. प्रदीप एकशिंगे यांना राज्य सरकारने मागील आठवड्यात निलंबित केले आहे. त्यामुळे तेथील प्रभारी अधिकारी पद रिक्त झाले होते. त्यामुळे तेथील प्रभारी अधिकारी पदाचा पदभार पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला होता.
गोंदी येथे कायमस्वरूपी प्रभारी अधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार.? याकडे संपूर्ण गोदाकाठचे लक्ष लागले होते. त्यातच आज पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांची गोंदीच्या प्रभारी अधिकारी पदी नेमणूक केली आहे. सपोनि. ठाकरे यांनी यापूर्वी टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच तत्पूर्वी, परतूर पोलीस ठाण्याचाही अनेक महिने त्यांच्याकडेच पदभार होता…