दहा जनावरांची सुटका…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (तिवसा) : तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोझरी दासटेकडी मार्गावर रात्रीच्या सुमारास पोलीसांनी कारवाई केली.या कारवाईदरम्यान अवैधरीत्या कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांसह पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून रोज अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जाते,अशी गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती.त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीसांनी सापळा रचून रात्रीच्या वेळी एमएच-३० बी.डी ००२९ क्रमांकाचे पिकअप वाहन जप्त केले.परंतु तत्पूर्वी पोलीसांना या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करावा लागला.
शेवटी येथील दासटेकडी मार्गावर वाहन पकडण्यात आले.
यावेळी वाहनातील सहा गाई,चार गोऱ्ह्यांना गो-शाळेत सोडण्यात आले.दरम्यान जप्त वाहनासह पोलीसांनी सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यातील वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.ही कारवाई तिवस्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश सपकाळ,शिपाई मोईन मांजरे,अरविंद गावंडे,वाहन चालक मस्के यांनी केली.पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत.