दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 26 सप्टें पिंपळे सौदागर (पुणे)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे 350 वे वर्ष आणि त्याचे औचित्य साधून राधाई नगरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील रहिवाशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळ्यातील सिंहासनाची एक प्रतिकृती करण्याचा प्रयत्न गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हे डेकोरेशन करताना यांनी नॅचरल अशा पद्धतीचा वापर करत प्लायवुड, एमडीएफ बोर्ड आणि पॅकेजिंग बॉक्स यांचा वापर करत हे सिंहासन तयार करण्यात आले. त्यातील नक्षीकाम करण्यासाठी क्ले चा वापर करण्यात आला आहे.
ही संकल्पना उभी करण्यामध्ये राधाई नगरी मधील रहिवासी आदिती टेपलवार आणि कविता पानघंटी यांचा महत्त्वाचा वाटा आहे.