दै.चालु वार्ता
प्रतिनिधी वाशिम दिनकर गडदे
वाशिम / जयपुर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी झालेल्या जगात ल्या सर्वात मोठ्या धम्म परिवर्तन सोहळ्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (सामाजिक न्याय व विशेष साहाय्यविभाग,महाराष्ट्र शासन ) यांची मान्यता प्राप्त संस्था प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूर, ढील्ली )ता. जि. वाशीम द्वारा संचालित प्रसंग करिअर अकॅडमी बार्टी वाशीम येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल पी इंगोले सर यांच्या अध्यक्षते खाली व वाशीम जिल्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. सरकार इंगोले यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला. डॉ गजपाल पी. इंगोले सर बोलतांनाआपण बुद्ध का झाले पाहिजे बाबासाहेब लिखित मुक्ती कोण पथे या पुस्तकातील सह उदाहरणं दाखला देऊन ह्या बद्दल योग्य माहिती दिली. तसेच जेष्ठ समाज सेवक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरकार इंगोले यांनी येवला परिषद मद्धे बाबासाहेब यांनी मी हिंदु म्हणून जन्मला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून आपण हा दिवस मोठा उत्साहाने साजरा करत आहो. असे म्हणाले ह्या प्रसंगी .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले सर व प्रमुख पाहुणे ह्यांच्या उपस्थिती मद्धे प्रशिक्षक प्रा. अंकुश मगर सर ह्यांची भारतीय पोस्ट सेवेत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचं शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी डॉ गजपाल इंगोले सर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण समन्वयक सतीश इंगोले , सप्नील राजगुरे प्रा. पल्लवी पखाले मॅडम विद्यार्थी हजर होते कार्यक्रम चे सूत्र संचालन प्रा. अमोल पाईकराव यांनी केलें तर सूत्र संचालन नीलम कांबळे यांनी केलें या कार्यक्रम प्रसंगी व प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते,अल्पोपहार व चहापान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…