नांदेड प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा अल्टा पलटी झाल्याने नांदेड
येथील आ. मोहनराव हंबर्डे हे श्रध्देय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारधारा घेऊन काँग्रेस मध्ये पुढे करणार अशी भूमिका घेतली आहे. सदरील नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे दिग्गज व नांदेड जिल्ह्यातील विकास कामांसाठी महत्वपूर्ण मानले जाणारे माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी श्रध्देय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचे विचारधारा घेऊन पुढे काँग्रेस मध्ये काम करणार अशी ठाम भूमिका आज नवीन मोंढा येथील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकित आ. हंबर्डे यांनी मांडली आहे.