दैनिक चालु वार्ता, लोनखेडा सर्कल,
प्रतिनिधी : हिम्मत बागुल
लोनखेडा सर्कल : म्हसावद शहादा तालुक्यातील तलावडी येथील जि. प. शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला म्हसावदचे केंद्रप्रमुख पराग चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलावर पावरा, टवळाई शाळेचे मुख्याध्यापक भिला निळे, म्हसावद कन्या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे, इस्लामपूर शाळेचे एकनाथ शिंदे, आसाराम बापू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, केंद्रातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक मुख्याध्यापक मंगा कापुरे यांनी केले. परिषदेत शैक्षणिक उपक्रमांबाबत झालेल्या चर्चेत रवींद्र बैसाणे, रायवंती पावरा, जितेंद्र निकम, शिवाजी पावरा, विजय निकम, महाले यांनी सहभाग घेतला. केंद्रप्रमुख चव्हाण यांनी शिक्षणाच्या सविस्तर नोंदी व शालेय रेकॉर्ड कसे ठेवावे, याबाबत मार्गदर्शन केले. परिषदेसाठी तलावडी शाळेचे मुख्याध्यापक मंगा कापुरे, विद्या भामरे, विजय निकम, शालिकराव बोरसे, छोटुलाल धनगर, करणसिंग पावरा, विनोद, संजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन करण पावरा तर आभार निकम यांनी मानले.