
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :-धोत्रा येथील श्री. सिद्धेश्वर महाराज देवस्थानच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात शासनाने 2 कोटी रुपयांचा
निधी उपलब्ध करून दिला. त्याअनुषंगाने धोत्रा येथे मंदिर परिसरात पहिल्या टप्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.याबाबत आज येथील स्थळ पाहणी करून गावकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संस्थान च्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. श्री. सिद्धेश्वर संस्थानचा विकास साधत असतांना गावकऱ्यांनी यात आपला सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी गावकऱ्यांना केले. यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंड, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, जि.प. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, विस्तार अधिकारी पी. बी. दौड आदींसह शिवना येथील राजू बाबा काळे, पालोदचे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, विजय खाजेकर, सुनील लांडगे, धोत्रा येथील जीवनसिंग जाधव, हरसिंग जाधव, श्री. सिद्धेश्वर संस्थानचे सांडूसिंग जाधव, आर. डी. जाधव, विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, धनराज जाधव, नारायण जाधव, राजेंद्र जाधव, ईश्वर जाधव आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.