
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
औराद :- औराद शहाजानी पोलिस प्रशासनाच्या आपत्कालीन क्रमांक डायल ११२ रात्री ११ वाजता हंसराज मोरे यांनी फोन करुन निलंगा-औराद जाणाऱ्या रोड वरील कविराज पेट्रोल पंपाजवळ हरणाचे पिल्लू (पाडस) जखमी अवस्थेत असल्याचे कळविताच तात्काळ औराद हद्दीत असलेल्या जागृत पोलीस प्रशासनाने त्या पाडसाला तात्काळ ताब्यात घेऊन औषधोपचार करुन वन विभागाच्या ताब्यात दिले.
महाराष्ट्र शासनाच्या अपत्कालीन नंबर ११२ च्या कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई भाग्यश्री गिरी यांना कविराज पेट्रोल पंपाजवळ एक हरणाचे पिल्लू जखमी अवस्थेत पडल्याची माहीतीचा फोन येताच त्यांनी सोबत वाहन चालक शिवाजी जेवळे, गोपनीय शाखेचे रवींद्र काळे यांना तात्काळ सोबत घेऊन स्थानिक पत्रकार अमोल ढोरसिंगे यांच्या मदतीने औराद च्या पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण यांना जवळपास चार ते पाच वेळा भ्रमनध्वनीवर संपर्क साधला असता ते फोन उचलत नसल्यामुळे ते जखमी हरणाच्या पाडसास बाहेर गावाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ.दाडगे यांच्या मदतीने उपचार करून जखमी हरणाचा जीव वाचवला व जखमी हरणाला वन विभागाच्या ताब्यात सोडण्यात यश आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले व मध्यरात्री सुध्दा अपत्कालीन नंबरवर मदत मिळाल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री गिरी यांचे व पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे व अशीच सेवा मिळत रहावी यासाठी पोलीस प्रशासनाला शुभेच्छा देण्यात येत आहे.