
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी याठिकाणी देशमुख गॅस एजन्सी जवळ भाड्याने राहत असलेले अंभारे कुटुंबीय.त्यांना वारस नाही ना नातेवाईक नाही,राहायला घर नाही, शिधापत्रिका आहे परंतु अंगठा उमटत नाही म्हणून राशन मिळत नाही.ग्रस्त कुटुंबीय पतीला ब्रेन ट्युमर ने ग्रासले तर दुसरीकडे पत्नी अपंग आहे. अश्या आर्थिक परिस्थितीनेच नाही तर शारिरीक,मानसिक तणावाने हतबल झालेल्या सौ.रेखा चंद्रकांत अंभारे दोघांचे वय जवळपास अंदाजे ५०-६० असून त्यांना अपत्य नाही तर नातेवाईक सुद्धा नाही अश्यातच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्थानिक संघटना विचारणा करण्यासाठी गेले असता हा संपूर्ण विषय उघडकीस आला.
आर्थिक परिस्थितीनेच नाही तर आजारपणाने सुद्धा या अनाथ कुटूंबीयाचा वाली कोण?लोकप्रतिनिधी ह्या अनाथ कुटुंबियांची दखल घेणार का? ह्याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. पातळीवर सामाजिक संघटना याविषयी प्रशासन दरबारी घेणार धाव माहिती प्राप्तीनुसार,स्थानिक जनता आर्थिक मदत करण्यास पुढे येत आहेत तर येवढ्यानेच थांबून चालणार नाही…पत्नी अपंग आणि पती ब्रेन ट्युमर ने ग्रासलेले असल्यामुळे त्यांना रुग्णालयीन सेवा देता येईल का?ह्याकडे सुद्धा लक्ष द्यावे असे सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगीता गोविंद मेन यांनी म्हटले.प्रहार,पतंजली,लोकजागर संघटना व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते या ग्रस्त कुटूंबियांचा व्यथा प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत आहेत.