दै.चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ राजेश भुस्से
लखिमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास व प्रियांकाजी गांधी यांना अटक केल्यामुळे, महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आव्हान करण्यात आले होते, त्यानुसार मुदखेड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सूचनेवरून मुदखेड शहरात व तालुक्यातील मोठ्या गावात 100% बंद पाळून *निषेध* करण्यात आला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व *महाविकास आघाडीतील* सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आज मुदखेड शहरात सर्व व्यापारी व दुकानदार बांधवाच्या सहकाऱ्यांनी मुदखेड शहर *बंद* ठेवण्यात यशस्वी झाले.
त्यानुसार महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित *मुदखेड* तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार मा. नागमवाड साहेबांना निषेध निवेदन देण्यात आले!
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्धव पवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय कुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवानंद शिपरकर, शहरप्रमुख सचिन चंद्रे, सचिन माने, पिंटू पा. वासरीकर, उत्तमराव लोमटे, किशोर देशमुख, प्रतापराव देशमुख, शंकर राठी, लक्ष्मणराव देवदे, बंदेअली पठाण, उत्तमराव चव्हाण, रामराम खांडरे, संजय कोलते, आनंदराव शिंदे, खदीर खुरेशी, सुरेश शेटे, इमरान मच्छीवाले, चांदू चमकुरे, रावसाहेब चौदते, सलाम सर, बालाजी गोडसे, किशोर पारवेकर, माऊली वासरीकर, सुधाकर देशमुख, चांदू बोकेफोड, खदीर कुरेशी, संजय आऊलवार, चक्रधर कळणे,सुरेश शेटे, प्रशांत कल्याने, बालाजी गुळेवाड, दत्तराव खानसोळे, गोविंदराव गाढे, पंडितराव चव्हाण, पिंटू ठाकूर, दादाराव पुयड, भास्कर कळणे, चंदू येगुर्ले, मुजीब पठाण, नितीन चौदते, गिरीश कोतावार, सुशील मुंगल, पिंटू ठाकूर, चव्हाण, चौदते,शेख बबलू, बजरंग खोडके, विनोद चव्हाण, कैलास चंद्रे, मेंटकर साहेबराव, यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार उपस्थित होते!
Related Stories
November 4, 2021
November 4, 2021