
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी चंद्रपूर
प्रदिप मडावी
चंद्रपूर :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयासोबतच वसतिगृहे सुद्धा 15/ 2/ 2022 पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी 2021 च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दि. 19/1/2022 पासून घेण्यात येत आहे. अश्यातच आदिवासी दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा देण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
परीक्षेच्या तोंडावर राज्यशासनाने वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संतापले, आम्ही शहरी भागात राहून परीक्षा देऊ आम्हाला डी. बी. टी. मार्फत खर्च देण्यात यावा अशीही मागणी विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मा. रोहन घुगे यांना निवेदनातून केली. यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह राजुरा येथील विद्यार्थी कविदास काटमोडे, देविदास सिडाम, सुरज पेंदोर, प्रशांत पेंदोरकर, उमाकांत मडावी, आशिष पेंदोर, अंकुश मेश्राम, कार्तिक तोरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.