
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा :- लोहारा तालुक्यात राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त लोहारा तालुक्यातील मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी यांच्यावतीने जिजाऊ जन्मोत्सव व विचार रथ तालुक्यातील तेरा गावात रथ फिरवण्याची सुरुवात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष दादा पाटील व लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकडे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली.
या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या मा.तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश गोरे तसेच डी.एस.बी पोलीस पांचाळ साहेब अभिजीत सूर्यवांशी,ओमकार चौगुले प्रतिभाताई परसे, इंदुमती पाटील संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे तालुका सचिव गंगाराम भोंडवे अविनाश सोमवंशी, राजकुमार गरड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या विचाररथाच्या माध्यमातून तालुक्यात महानाईका व महापुरुषांचे विचार सांगन्याचे काम ब्रिगेड च्या माध्यमातुन केले जात आहे.