
दैनिक चालु वार्ता
माळाकोळी प्रतिनिधी
गणेश वाघमारे
सुनेगाव :- सुनेगाव येथे झालेल्या बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चिखलीकर साहेब यांनी दोन ते तीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी कोणकोणती कामे केली याचे सविस्तर विवेचन सांगितले. तसेच दत्त मंदिर संस्थान, बोरी चा महादेव, येथे सुद्धा निधी आणल्याचे सविस्तर सांगितले ,जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा स्थापन करण्याच्या सेवेची माहिती सुद्धा त्यांनी दिली. आणि त्यांच्या मनोगतातून त्यांनी कंधार लोहा तालुक्यातील नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी बुथ कार्यकर्ते व शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले.
बुथ अभियान व शक्ती केंद्र प्रमुख मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये महामंत्री विभागीय संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रलेखा ताई गोरे लोहा तालुका प्रमुख शरद पवार कंधार भाजपाध्यक्ष भगवान राठोड, सचिन पाटील चिखलीकर सभापती आनंदा पाटील शिंदे ,उपसभापती नरेंद्र गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील कदम, ठकररवाड साहेब ,नांदेड दक्षिण अध्यक्ष सुनील मोरे ,गंगाधर येनावार, प्रवीण धुतमल, नामदेव चव्हाण, सूर्यकांत गायकवाड, भानुदास पवार, मारोती कदम , बाळू पवार ,भानुदास पवार ,गोविंदराव कदम ,बाळू पाटील कदम ,राजेश पावडे गंगाधर कदम , माधव सावंत आदी मंडळी भाजपा कार्यकर्ते बुथ प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते