
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- आवाळपूर इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत च्या पटांगणात प्रजासत्ताक दिन एकदम साध्यासुध्या व काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गेले दोन वर्ष कोरोनामूळे शाळा बंद असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सूट्टी आहे प्रजासत्ताक या शूभ दिवशी सूध्दा विद्यार्थी शाळेत येवू शकले नाही,
मूला शिवाय शाळेला काहीच अर्थ नाही अस म्हटलं तरी चालेल,
पण या कोरोना म्हातारीच्या रोगामुळे शाळा व महाविद्यालये बंद आहे.
१९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी समूदा समीती स्थापन करण्यात आली, या समीतन संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा साजरा करण्यात येवू लागला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मेघराज उपरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तर सूत्रसंचालन दरेकर मॅडम यांनी केले, तसेच ग्रामपंचायत च्या पटांगणात आवाळपूर गावची प्रथम नागरिक सरपंच प्रियांका ताई दिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सूत्रसंचालन मेघराज उपरे सर यांनी केले.
या प्रसंगी प्रमूख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप मडावी, निकिता नांदेकर उपाध्यक्ष पंढरी मूसळे सर केंद्रप्रमुख, मारोती कूचनकर सदस्य शांता ताई धोटे, आवाळपूर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ठाकरे साहेब, प्रियंका ताई दिवे सरपंच, बाळकृष्ण काकळे उपसरपंच, कल्पतरू कंनाके, ग्रामपंचायत सदस्य एकता वानखेडे, योगेश काटकर तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत आवाळपूर तसेच अंगणवाडी सेविका अर्चनाताई दूधकोर, ताजने मॅडम, आशाताई तिरनकर मॅडम,मांदाळे मॅडम, अलोने मॅडम, माधूरी धोटे मॅडम, आणि रेखा ताई कांबळे मॅडम, आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.