
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.27 नांदुरा शहरातली गणी पेट्रोल पंप व मुंधडा पेट्रोल पंप या पंपावर गाडीमध्ये मोफत हवा भरण्याचे यंत्र सुविधा सुरू नाही,महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही,२४ तास पेट्रोल सुविधा नाही,पेट्रोल पंप वर २४ तास सेवा उपलब्ध ठेवण्याचे आदेश असताना देखील लेखी मधे रात्री १२ ते सकाळी ४ बंद ठेवण्याचा उल्लेख कुणालाही न घाबरता सर्रास लेखी देतात म्हणजे एखाद्या संकटाच्या काळात इथे रात्री पेट्रोल मिळत नाही अशा अनेक नागरी सुविधांचा येथे अभाव आहे.
तसेच नगर परिषद मुख्याधिकारी नांदुरा यांनी या दोन्ही पेट्रोल पंपाला कुठल्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे लेखी पत्र उपोषणकर्ते यांना दिले असून यावर कार्यवाही व्हावी जेणेकरून नागरिकांना याचा फायदा मिळेल या शुद्ध हेतूने वारंवार स्थानिक पातळीपासून पेट्रोलियम मंत्रालयापर्यंत तक्रारी करूनही या नियम धाब्यावर बसविणाऱ्या पेट्रोल पंपावर कार्यवाही झाली नसल्याने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे यांनी २४ जानेवारी पासून तहसील कार्यालया समोर न्याय मिळेल या आशेवर अन्न पाण्याविना आमरण उपोषणाला बसले आहे.
यावर तहसील कार्यालयाकडून खोटे पत्र देऊन या पेट्रोल पंपावर सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे पत्र दिले.असे खोटे पत्र देण्यासाठी किती आर्थिक देवाण घेवाण झाली याची चौकशी व्हावी व या पेट्रोल पंपावर कार्यवाही व्हावी यासाठी हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय किशोर इंगळे यांनी घेतला असून ते अद्याप उपोषणावर कायम आहेत.
सोबतच जिल्हा परिषद अंतर्गत केदार येथील शाळेमध्ये ३ ते ४ वर्षांपासून वीज पुरवठा खंडित केला असून तो पूर्ववत सुरू करावा,केदार ते डिघी या रस्त्याचे पालकमंत्री पाणंद रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी,नांदुरा अर्बन व शिक्षक सहकारी पसंस्थेचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यावर प्रशासक नियुक्त करावे या मागण्यासाठी हे आमरण उपोषण सुरूच आहे.हे उपोषण ३ दिवसांपासून सुरू असून आज चौथा दिवस उजाडला आहे.तरी देखील प्रशासन यामधे न्याय न देता गैरकाम करणाऱ्यांना पाठीशी का घालत आहे हा संशोधनाचा विषय आहे