
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
दिगंबर वानखेडे
सोनखेड :- सोनखेड येथील 26 जानेवारी चा ध्वजारोहण शहीद जवान संतोष सिद्धापुरे यांच्या पत्नी च्या हस्ते केला सोनखेड येथील लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच श्री. अच्युत शंकरराव मोरे हे नेहमी वेगवेगळ्या उपक्रमांसाठी चर्चेत असतात या वेळी पण त्यांनी आपला मनाचा मोठेपणा दाखवत ध्वजारोहणाचा मान सोनखेड येथील शहीद जवान संतोष गंगाधर सिद्धापुरे यांच्या पत्नीला माण देऊन. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती समोर आदर्श ठेवला आहे.
सध्याचे राजकारणी माण पानासाठी आसुसलेले असतात ,पण अचूक जी होते यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून मागील ध्वजारोहण चा माण सामान त्यांनी आयुष्यभर देशासाठी आपल्या हाडाची काडे केलेली असतात त्या वेळ प्रसंगी आपल्या देशासाठी रक्त सांडण्या ची तयारी त्यांनी आपल्या सेवेसाठी दाखवलेली असते. त्यांना सेवानिवृत्त नंतर जो मान मिळायला हवा तो मिळत नाही हा विचार करून कॅप्टन संजय जी कदम साहेब यांना ध्वजारोहणाचा मान दिला होता. यावेळी पण तीच परंपरा कायम ठेवत 26 /1/2022या प्रजासत्ताक दिनाच्या वीरपत्नी च्या हस्ते करण्यात आला.
सोनखेड गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय सोनखेड या ठिकाणी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आयोजक सोनखेड ची सरपंच अच्युत मोरे लोकनियुक्त सरपंच माननीय ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.