
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- बहादरपूर येथील मन्याड नदीवरील फुलाचे व पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता अत्यंत खराब झाला असून हा रस्ता ये-जा करण्याच्या स्थितीत राहिला नाही. तसेच तालुक्यावर येण्या जाण्याचा एकमेव मार्ग असणारा हा रस्ता पूर्णतः खड्ड्याने भरल्याने चारचाकी दुचाकी वाहन चालकांना अतीशय कसरतीने वाहने चालवावी लागत आहेत या ठिकाणी अपघाताचे ही प्रमाण खूप वाढले आहे . नदीवरील मोडकळीस आलेला पुल व त्या पुलाच्या बाजूंचे स्टील रुलींग तुटलेली आसल्या मुळे रात्रीच्या वेळी वाहने नदीत कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
तरी या धोक्याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने रस्ता व पुलाची दुरुस्ती करुन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार कंधार यांना संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने देण्यात आले. यावेळी बळीराम पवार सर (मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष) नितीन पाटील कोकाटे (ता.अध्यक्ष ) विकास पाटील लुंगारे (शहर अध्यक्ष ) मनोज पाटील इंगोले (ता.कार्याध्यक्ष) संभाजी गायकवाड (ता.उपाध्यक्ष) माधव पाटील. ( ता उपाध्यक्ष ) क्रिष्णा गोटमवाड (ता.कार्याध्यक्ष) नामदेव पाटील जोगदंड (ता संघटक), धनंजय कौंसल्ये (तालुका कार्य अध्यक्ष)व दैनिक बाळकडू चे पत्रकार गजानन जाधव हे उपस्थित होते.