
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
मोताळा :- दि.28 मोताळा नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल नुसतेच लागले.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक हाती असलेली सत्ता कायम ठेवली पुन्हा नगरपंचायती वर 17 पैकी 12 जागा निवडून आणि एक हाती सत्ता काबीज केली. मोताळा नगरपंचायत निवडणुकीचे पक्ष निरीक्षकाची जबाबदारी असलेले मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीश रावळ यांनी सांभाळलेली नियोजनबद्ध प्रचाराची धुरा अन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोताळा तालुका अध्यक्ष गजू मामलकर यांनी केलेले प्रयत्न ह्यामुळेच मोताळा नगरपंचायती वर दणदणीत विजय मिळवला.
एखादी सत्ता असलेल्या भाजपाचे उमेदवाराला पराभूत करण्यासाठी करिता व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे यांच्या विजया करिता नगराध्यक्ष ऍड. हरीश रावळ यांनी मतदारसंघ पिंजून काढत त्यांचे विजयात मोलाचा हातभार लावला. तर मोताळा येथेही ऍड. हरीश रावळ यांनी पक्ष निरीक्षकाचीभूमिका चोख बजावीत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून त्या ठिकाणी उभ्या असलेल्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर करीत 17 पैकी तब्बल 12 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणले.
यामध्ये तालुका अध्यक्ष गजू भाऊ मामलकर,मोताळा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जि. प. सदस्य,पं. स. सदस्य, पदाधिकारी,कार्यकर्ते, यांचाही मोलाचा वाटा आहे. तर शिवसेनेला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाल्या. भाजपा व वंचित ला साधे खातेही उघडता आले नाही. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा येथे सुमारे 27 कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांचा झंजावातची घोषणा असतानाही मतदारांनी मात्र त्यांच्या उमेदवारांना सत्तेपासून दूर ठेवले.