
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
श्री.अ.दि.पाटणकर
पुणे :- वारकरी संप्रदायातील प्रथम शिव उपासक असलेले आणि ज्यांना शिव आणि विठ्ठल एकच असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर पुढील संपुर्ण जीवन विठ्ठलमय करणारे संत नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यातील आंबेगाव पठार येथील मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी संपुर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता तर सुमधुर आवाजातील भक्तीगीतांनी वातावरण भक्तीमय झाले होते.
या सोहळ्याला चंद्रकांत पाटणकर, चंद्रकांत दिक्षित, जेष्ठ पत्रकार आत्माराम ढेकळे,अॅड.शुभांगी पाटणकर, रुपाली दिक्षित, वंदना पंडित, सारिका दिक्षित,पुनम पाटणकर, श्रध्दा पंडित आदी मान्यवरांसह पांचाळ सोनार समाजातील समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वर्धापन दिन सोहळाचे आयोजन विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाचे अध्यक्ष आशिष पंडित, उपाध्यक्ष मनोज भावेकर,सचिव लक्ष्मण पाटणकर यांचेसह सर्व विश्वस्तांनी अत्यंत नियोजनबद्ध केले होते.