दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी. बालाजी देशमुख
घाटनांदूर (बातमीदार ) : बीड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी एस एम शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कवच कुंडल योजने अंतर्गत जे दिव्यांग कोविड लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा दिव्यांगांना विशेष शिक्षक दिव्यांग व्यक्तींना लस देण्यास मदत करत आहेत .
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर
येथील दिव्यांग कबीर संतराम गोदाम यांना मंगळवारी (ता . १२ ) जवळगाव येथील ज्ञानसागर कर्णबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक राहुल किर्दंत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घाटनांदूर येथील आरोग्य सहाय्यक श्री एस. के . गोरे , श्रीमती ए. आर . शेख , आरोग्य सेविका श्रीमती टी . बी . नेहरकर ,आरोग्य सेवक ए. एस .
पुजारी वाहन चालक गणेश शिंदे यांनी दिव्यांगाच्या घरी जाऊन लसीकरण केले .
जवळगाव ( ता अंबाजोगाई ) येथील ज्ञानसागर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विशेष शिक्षक दिव्यांगांना लसीकरण करत आहेत.