
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- शासनाकडील विलिनी-करणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांच्या संपाला जानेवारी अखेर तीन महिने पुर्ण झाले. या संपामुळे नांदेड विभागातील नऊ आगारात जवळपास ५२५ लालपरी बसेस अजूनही जागेवरच उभ्या आहेत. यामुळे या लालपरी नादुरुस्त होण्याचा धोका वाढला असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एसटी कर्मचा-यांचे राज्य सरकारने विलीनकरण करावे या मागण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचा-यांनी कामा बंद आंदोलन सुरू करून संप पुकारला आहे. दि.२८ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या संपाला जानेवारी अखेरीस तीन महिने पुर्ण झाले आहेत.मात्र संपावर तोडगा निघाला नाही.
यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होत असून गत तीन महिन्यात एसटी महामंडळाचे कोटयावधी रूपयांचे उत्पन्न पाण्यात गेले आहे.एसटीच्या नांदेड विभागाअंतर्गत नऊ आगार आहेत.नांदेड,कंधार,लोहा,माहूर,देगलूर,मुखेड,हदगाव,किनवट व बिलोली या नऊ आगारातून संपापुर्वी जवळपास ५५० बसगाडया अर्थात लालपरी धावत होत्या.मात्र या बसचे सारथ्य करणारे चालक,वाहक मोठया संख्येने संपात सहभागी झाले आहेत.
एसटी प्रशासनाने काही चालक व वाहकांची मनधरणी करून कामावर रुजू करून घेतल्याने नांदेड विभागातून केवळ २५ लालपरी धावत आहेत. मात्र माहूर आणि मुखेड आगारातुन एकही बस सुरु झाली नाही. अजूनही तब्बल ५२५ लालपरी अजूनही प्रत्येक आगारात जागेवरच थांबून आहेत. या लालपरी बसेस अनेक दिवसांपासून एका जाग्यावरच बंद स्थितीत उभ्या असल्याने इंजिन मधील ऑइल गोठणे, इंजिन जॅम होणे, बॅटरी डिस्चार्ज होवून त्या नादुरूस्त होणे.
अनेक छोटे,मोठे पार्ट नादुरूस्त होण्याची शक्यता वाढली आहे.यामुळे जागेवर उभ्या असलेल्या या लालपरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.जर संपा वाढत गेला तर जागेवर उभ्या असलेल्या लालपरीला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने मोठया प्रमाणात आर्थिक भुर्दड सहन करावा लागेल अशी शक्यता जाणकांकडून व्यक्त होत आहे.