
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- केंद्र सरकारकडून ही योजना कामगार व मजुरांसाठी राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून आयुष्यभर या कार्डचा वापर करता येतो या शिबिराचे आयोजन माधुरी अमोल तुमाने यांच्या मार्फत घेण्यात आले तसेच दि 30 जानेवारी 2022 ला मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते ई श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले व कोरोना वर मात करण्यासाठी मास्कचा वापर अवश्य करावा याबद्दल माहिती देऊन मास्क वाटप करण्यात आले.
ई श्रमिक कार्डच्या माध्यमातून कामगार व मजुरांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे यामध्ये,विमा संरक्षण, अपंगत्व, अपघाती मृत्यु झाल्यास लाभ मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी ई श्रमिक कार्डची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना ई श्रमिक कार्ड वाटप करण्यात आले याप्रसंगी अमोल तुमाने, ऐश्वर्य बावनकर, प्रकाश कनोजे,सर्वेश माकडे,फैजल शेख,तेजस ढोमने,पीयूष माहुले,अतुल कुर्झेकर उपस्थित होते.