
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
नांदेड :- नांदेड येथील प्रसिद्ध प्रभात कोचिंग क्लासेस मध्ये कॉमर्स विषयावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली , त्यामध्ये नांदेड येथील कॉमर्स विषयातील प्रसिद्ध असे ब्रिलीयन्ट कॉमर्स अकॅडमी यांच्यामार्फत नवोदित कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ही स्कॉलरशिप एक्झाम घेण्यात येते. या परीक्षेत प्रभात संस्कृत कोचिंग क्लासेसच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या जीवनात आर्ट कॉमर्स सायन्स असे तीन पर्याय अकरावीला सुरू होतात. त्यातील बहुतांश विद्यार्थी हे सायन्स कडे वळलेले दिसून येतात परंतु कॉमर्स विभागात देखील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याबाबत ब्रिलियंट कॉमर्स अकॅडमी गेल्या दहा वर्षापासून मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व कलचाचणी परीक्षा राबविल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या बाजूस आहे हे पालकांना सहज समजते यामुळे विद्यार्थ्यांनी पुढच्या जीवनात कोणते क्षेत्र निवडावे याबाबत देखील मदत होते.
अशीच कल चाचणी परीक्षा व स्पर्धा परीक्षा खांडेकर सरांचा क्लासेस मध्ये घेण्यात आली आणि यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून पंचवीस विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 1 ते 25 असे पहिले पंचवीस क्रमांक मिळवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयाचे कुपण व चांदीचे नाणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याचा एकमेव उद्देश म्हणजे पुढील जीवनात त्यांना अभ्यासाबाबत उत्साह निर्माण व्हावा व मागील दोन वर्षात कोरोना काळा मुळे झालेले नुकसान भरून निघावे, परत विद्यार्थी अभ्यासाकडे वळावे हाच मुख्य उद्देश होता.
यात विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग नोंदवला आणि जिल्ह्यातून पहिले पंचवीस क्रमांक देखील मिळवले त्याबद्दल क्लासेसचे संचालक विश्वास प्रकाश खांडेकर व व्यवस्थापक विक्रम प्रकाश खांडेकर व ब्रिल्यन्स कॉमर्स अकॅडमी यांच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले अनेक वर्षानंतर म्हणजेच कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक अपूर्व उत्साह यावेळी पाहावयास मिळाला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खरोखरच अवर्णनीय होता.