
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. भारतातील प्रसिध्द उद्यगोपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांचे पार्थिव रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून, रविवारी (दि.13) संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता.
बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.