
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- आता संपूर्ण भारतातच रस्त्यांचा विकास चालू आहे काही ठिकाणी चांगले रस्ते होत आहे तर काही ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीचे कामे चालु आहेत. असेच आपल्याला बारड ते दुधनवाडी या रस्त्याच्या कामावर आढळून येईल. या ठिकाणी रस्त्याचे काम तर चालूच आहे परंतु मूळ पुलाच्या पाइपलाच खड्डे पडले आहेत ते पाईप बदलण्या ऐवजी त्यात दगड माती गोटे भरून त्याच्यावर मुलामा केला जात आहे, मग याच्या टिकण्याबद्दल शंका निर्माण होणारच .
याविषयी सुरेश फुलारी भाजपा तालुका उपाध्यक्ष यांनी वारंवार या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यांच्याशी पत्रव्यवहार केला तरीदेखील शासनाचे अधिकारी काम उत्कृष्ट आहे असे म्हणून टाळाटाळ करीत आहेत तरी उच्च अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कामाची चौकशी करावी अशी मागणी सुरेश फुलारी भाजपा तालुका उपाध्यक्ष यांच्याकडून होत आहे.