
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि बारामती
रियाज़ शेख
बारामती :- बारामती टेक्सटाइल पार्कच्या अद्यक्ष सौ सुनेत्रा अजित पवार यानी रविवार दी 20 रोजी बारामती क्रीड़ा संकुलास सदिच्छा भेट दिली. सौ पवार यानी क्रीड़ा संकुलतिल प्रत्येक खेळाची परिपूर्ण माहीती घेतली, यामधे सौ पवार यानी लॉन टेनिस, बैडमिंटन, कराटे याची माहीती घेत खेळाडूनशी सविस्तर चर्चा केली व त्याना योग्य ते मार्गदर्शन केले.
बारामती वेगाने बदलत आहे एक स्मार्ट सिटी म्हणून बरामतीची सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरु आहे. या बदलत्या बारामतीचा आणि बारामतीच्या विकासाचा सौ पवार यानी मगोवा घेतला. बारामती तालुका क्रीड़ा संकुलचे अधिकारी श्री जगन्नाथ खंडू लकड़े यानी सौ सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले तसेच क्रीड़ा संकुल मधे होणाऱ्या सर्व खेळाची माहीती दिली.