
दैनिक चालु वार्ता
भिगवण प्रतिनिधी
इंदापूर :- डिकसळ हे गाव इंदापुर तालुक्यातील सर्वात टोकाचे गाव या गावाची लोकसंख्या अवघी २ हजार हे गाव छोठ जरी असलं तरी इथल्या लोकांच मन मोठ असल्याने मी या गावासाठी मोठा निधी दिला असुन भविष्यात सुद्धा या गावासाठी विकास निधीच्या बाबतीत मी झुकत माफ देणार आहे तसेच डिकसळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी कसल्याही प्रकारचा निधि कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डिकसळ येथे तब्बल ४ कोटीच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन व भुमिपुजन समारंभानंतर योगेश्वरी मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार डिकसळ गाव ते दशक्रिया विधी घाट या रस्त्यासाठी ४० लाखचा निधी जाहीर केला. सभेपुर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची गावातुन घोड्यावर बसुन जंगी मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प .सदस्य हनुमंत बंडगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर होते. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी चिटणीस अॅड. महेश दादा देवकाते ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी खजिनदार सचिन बोगावत,रोटरी क्लबचे मा.अध्यक्ष महेश शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य प्रताप पाटील,नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,डी.एन जगताप,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वाबळे,भिगवणच्या मा.सरपंच हेमाताई माडगे,प्रदीप वाकसे ,आण्णासाहेब धवडे,मनोज राक्षे,प्रमोद नरुटे,आबासाहेब बंडगर,अमर धवडे,अजिंक्य माडगे,किरण पन्हाळे,सुरेश बिंबे,डिकसळ उपसरपंच सुनिता गवळी,मा.उपसरपंच सायली गायकवाड,लक्ष्मण शिर्के (कुंभार),आजिनाथ गायकवाड,धनंजय पवार, ग्रामपंचायत सदस्य मारुती शिंदे,माधुरी भोसले,ललिता पोंद्कुले,योगेश्वरी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब गवळी, मा.चेअरमन जिजाराम पोंदकुले,अर्जुन सुर्यवंशी, आबासाहेब हगारे, शशिकांत कुंभार, दत्तात्रेय हगारे,तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर काळे,प्रताप गवळी,सुभाष दादा चव्हाण, अजिनाथ भोंग,अजित गावडे,मा.व्हा. चेअरमन सोमनाथ भादेकर,सुहास गायकवाड, विकास पवार,महेंद्र सवाने,प्रमोद जाधव,प्रशांत पवार,हेमंत कुंभार,दत्तात्रय पवार,देविदास कुंभार,संजय भादेकर,कुमार शिंदे ,विकास शिंदे,किसनाथ पवार आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन देवानंद शेलार प्रास्ताविक विजयकुमार गायकवाड यांनी केले तर आभार अनिल पोंदकुले यांनी मानले.