
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पांढरपूर :- महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नोकरी व व्यवसाया संदर्भात मोफत मार्गदर्शनसाठी प्रवेश नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील व प्रदेश चिटणीस युसूफ शेख यांनी ॲपची लिंक उपलब्द करुन दिलेली आहे.
https://docs.google.com या लिंकचा वापर करुन जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी आपली नोंदणी सदर लिंकवर करुन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे आवाहन पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी केले आहे.